' मराठी वाङ्मय मंडळ ' अहवाल
२०१२-२०१३
                        
विरार- वसई भागातील लोकनेते मा. श्री हितेंद्र ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली १९८८ साली 'विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट' ची स्थापना करण्यात आली.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक सुविधा याच भागात मिळाव्यात व मुंबईला ये-जा करावी लागू नये, यासाठी विवा महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली.
                        
याच विद्यार्थ्यांचा सामाजिक सांस्कृतिक विकास व्हावा, भाषेविषयीची गोडी वाढावी, आत्मविश्वास वाढावा यासाठी बुधवार दिनांक ९ जानेवारी २०१३ रोजी माननीयप्राचार्य डॉ .रविकिरण भगत, प्रा. प्राजक्ता परांजपे, प्रा .शीतल वर्तक, संस्थाधिकारी
प्रा. कुट्टी सर व 'अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे वसई' येथील मराठी विभाग प्रमुख प्रा. शत्रुघ्न फड व प्रा. सखाराम डाकोरे यांच्या उपस्थितीत 'मराठी वाङ्मय मंडळ ' उदघाटन सोहळा आयोजित करण्यात आला.
                        
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा कविता पाटील यांनी केले. प्रा. फड सरांनी अमूल्य मार्गदर्शन केले. प्रा आराधना जोशी यांनी कार्यक्रमाचा समारोप केला.
' मराठी वाङ्मय मंडळ ' अहवाल
२०१३-२०१४
                        
"सर्वांसाठी शिक्षण " या एकाच ब्रिदवाक्याने प्रेरित होऊन वसई विरार पट्टा राष्ट्रीय स्तरावर प्रगती पथावर यावा यासाठी "विवा ट्रस्ट " प्रयत्नशील आहे.
                        
मुंबईतील शिक्षण संस्थांच्या तुल्यबळ विविध शैक्षणिक उपक्रम शिक्षणाच्या नवनवीन वाटा या भागातील विद्यर्थ्यांसाठी उघडण्याचे कार्य अजुनही सुरू आहे.
                        
या अनुषंगाने मुलामध्ये असलेली साहित्य विषयीची तळमळ, जिज्ञासा, जिगाशु वृत्ती वाढीस लावण्याच्या उद्देशाने ९ जानेवारी २०१३ रोजी मराठी वाङ्मय मंडळाची स्थापना करण्यात आली.
                        
या मंडळांतर्गत सर्व प्रथम निबंध स्पर्धा घेण्यात आली. ज्यांचे विषय हे राजकीय, सामाजिक, वैचारिक स्थितीवर भाष्य करणारे होते या स्पर्धेस विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त सहभाग मिळाला.
                        
लोकमान्य टिळक पुण्यदिन स्मरणार्थ वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली.
                        
तसेच मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने “चला बोलूया मराठी” ही स्पर्धा घेण्यात आली . यास विद्यार्थ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला.
' मराठी वाङ्मय मंडळ ' अहवाल
२०१४-२०१५
                        
'विवा महाविद्यालयातील ' विद्यार्थ्यांची भाषे विषयीची गोडी बघून लेखनाकडे वाढणारा कल लक्षात घेऊन पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
आत्मविश्वास वाढण्यासाठी वक्तृत्व स्पर्धा, वाचनकल वाढण्यासाठी निबंध स्पर्धा,कल्पनांना - प्रतिभेला वाव देण्यासाठी 'कवितेला शोधीत जावे'
स्पर्धा, शुद्धलेखन, भाषा सामर्थ्य वाढण्यासाठी 'अक्षरांचे आभाळ' स्पर्धा, विद्यार्थ्यांमध्ये अंतःस्फूर्ती वाढविण्यासाठी 'शोध कवितेचा' स्पर्धा घेण्यात आली.
                        
तसेच २७ फेब्रुवारी २०१५ हा दिन 'मराठी भाषा दिन' म्हणून साजरा करण्यात आला. यासाठी गीतकार श्री मंदार गोगटे यांचे 'बोलतो मराठी' या विषयावर व्याख्यान झाले.
                        
तसेच वर्षभरातील विद्यार्थ्यांच्या कविता, लेख, 'हस्तलिखित' स्वरूपात प्रकाशित करण्यात आले.
' मराठी वाङ्मय मंडळ ' अहवाल
२०१५-२०१६
                        
'विवा महाविद्यालय' सर्वांसाठी शिक्षण' या ध्येयाने प्रेरित होऊन प्रगतीपथावर कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या भाषिक, सांस्कृतिक, सामाजिक विकासाचे ध्येय समोर ठेऊन 'विवा वाङ्मय मंडळ' स्थापन करण्यात आले.
या अंतर्गत विदयार्थ्यांच्या लेखन, कल्पनाशक्तीला वाव मिळावा या हेतूने 'निबंध स्पर्धा' घेण्यात आली.
भाषा, उच्चार, सभाधीटपणा, यासारखी कौशल्ये विकसित होण्याच्या अनुषंगाने दि. ०४/०८/२०१६ रोजी विद्यर्थ्यांच्या उत्तम प्रतिसादात 'वकतृत्व स्पर्धा' घेण्यात आली.
                        
विद्यर्थ्यांमधील स्पर्धेविषयी भीती नाहीशी करून प्रतिसाद वाढावा या अनुषंगाने 'हस्ताक्षर स्पर्धा' व 'अक्षर गणेश' स्पर्धा आयोजित केली.या दोन्ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या भरघोस प्रतिसादात पार पडल्या.
विद्यार्थ्यांमध्ये स्व: भाषा प्रेम निर्माण होऊन आजच्या भाषिक स्थितीवर प्रकाश पडावा या हेतूने प्रा. रंजिता वीरकर यांचे दि. ११/०२/२०१६ रोजी
'मराठी भाषा आणि आजचा युवा वर्ग' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.लेख वाचन, गायन उपक्रम राबविला.
20 फेब्रुवारी 2016 'मातृभाषा दिनानिमित्ताने’ 26 फेब्रुवारी 2016 रोजी 'मी मराठी' हा विद्यार्थी लिखित दिग्दर्शित छोटा नाट्यप्रयोग सादर करण्यात आला.
तसेच शिरवाडकरांच्या नाट्यप्रयोग ,उताऱ्यांचे वाचन शिक्षक व विद्यार्थी सहभागाने उत्तम प्रतिसादात पार पडले.
27 फेब्रुवारी 2016 'मराठी भाषा दिन' निमित्ताने प्रा.विना सानेकर यांचे 'बदलती मराठी भाषा: एक आव्हान' या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले. जे विद्यार्थ्यांच्या उत्तम सहभागाने पार पडले.
मराठी भाषादिन अहवाल
                        
विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट संचलित विवा कॉलेज सर्वांसाठी शिक्षण हे ब्रीदवाक्य ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे.
विद्यार्थ्यांची साहित्यविषयक तळमळ , जिज्ञासा हेरून, मराठी भाषेवरचे प्रेम ओळखून या भाषेच्या अंगाचे साहित्याचे विद्यार्थ्यांना दर्शन व्हावे या हेतूनेच विवा कॉलेज येथे ९ जानेवारी 2२०१३ रोजी 'विवा मराठी वाङ्मय मंडळ' स्थापन करण्यात आले.
या मंडळांतर्गत २७ फेब्रुवारी २०१५ हा दिन ” मराठी भाषा दिन” म्हणून साजरा करण्यात आला. या अनुषंगाने आयोजित 'बोलतो मराठी ' संगीत संयोजक व मराठी अभिमान गीताचे सहाय्यक निर्माते श्री मंदार गोगटे उपस्थित होते.
मराठी भाषा व मराठी माणूस यांच्यातील नात्याविषयी बोलताना ते म्हणाले की "खरंतर एकमेकांचे पाय खेचण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सर्वसामान्य मराठी माणसाचा रु ५०० इतक्या देणगीतूनच आज प्रत्येक कार्यक्रमाच्या आधी वाजवल्या जाणाऱ्या 'मराठी अभिमान गीता' चा जन्म झाला आहे.
तसेच अनेक शिक्षक व विद्यार्थी यांनी स्वरचित कविता, नाटुकली , स्फुटवाचन सादर केले. या मध्ये विद्यार्थ्यांबरोबरच महाविद्यालयाचे प्राचार्य, उप प्राचार्यही सहभागी झाले होते.
या शिवाय प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते 'विवांकुर ' या हस्तलिखितांचे प्रकाशन करण्यात आले.
वर्षभरातील विविध स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्रांचा वाटप करण्यात आला.
मराठी भाषादिन अहवाल २०१५-२०१६
                        
विष्णू वामन ठाकूरचॅरिटेबल ट्रस्ट संचलित विवा कॉलेज सर्वांसाठी शिक्षण हे ब्रीदवाक्य ठेवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी कार्यरत आहे.
                        
विद्यार्थ्यांची साहित्यविषयक तळमळ , जिज्ञासा हेरून, मराठी भाषेवरचे प्रेम ओळखून या भाषेच्या अंगाचे साहित्याचे विद्यार्थ्यांना दर्शन व्हावे या हेतूनेच विवा कॉलेज येथे ९ जानेवारी २०१३ रोजी 'विवा मराठी वाङ्मय मंडळ' स्थापन करण्यात आले.
                        
तसेच २६ फेब्रुवारी २०१६ मातृभाषा दिन म्हणून साजरा करण्यात आला. या अनुषंगाने विविध कवितांच्या सादरीकरणावर आधारित स्पर्धा घेण्यात आली विद्यार्थ्यांना पारितोषिक, प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
या मंडळांतर्गत २७ फेब्रुवारी २०१६ हा 'मराठी भाषा' दिन म्हणून साजरा करण्यात आला. या अनुषंगाने प्रा. वीणा सानेकर यांचे 'बदलती मराठी भाषा: एक आव्हान' या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
मराठी संवर्धन पंधरवडा
                        
भाषा संचालक महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्र . सभादी.- २०१५/३०१७/२२३३/१४ दि.१६/१२/२०१५ नुसार "मराठी संवर्धन पंधरवडा" साजरा
करताना विवा महाविद्यालयातील मराठी वाङ्मय मंडळातर्फे 'मनातले मंगेश पाडगावकर' हा शिक्षक - विद्यार्थी संयुक्तीने 'कविता वाचनाचा' कार्यक्रम करण्यात आला व निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
                        
तसेच 'विविध लेखक - कवी ' यांच्या साहित्यावर आधारित 'पुस्तक - परीक्षण स्पर्धा घेण्यात आली. याचबरोबरीने विद्यार्थी लिखित कविता, लेख यांचे 'हस्तलिखित' तयार केले.
'मातृभाषादिन' अहवाल’
                        
विवा महाविद्यालयात 26 फेब्रुवारी 2016 रोजी मातृभाषा दिना निमित्त मराठी वाङ्मय मंडळातर्फे महाविद्यालयांतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.
                        
मराठीतील विविध कविता गीत गायन नाट्य उताऱ्यांचे वाचन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी स्वलिखित 'मी मराठी' या नाट्यप्रयोगाचे सादरीकरण केले. तसेच विद्यार्थी हस्तलिखितांचे प्रकाशन झाले.
या सगळ्याच कार्यक्रमास महाविद्यालयातील कला, वाणिज्य व विज्ञान शाखांमधील विद्यार्थ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.